बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    उद्दिष्ट:

    राज्य भरात परवडणारी, शाश्वत आणि सर्व समावेशक गृहनिर्माण विकासाला चालना देण्यासाठी धोरणे, कार्यक्रम आणि नियम तयार करणे आणि त्याची अंमलब जावणी करणे ही गृहनिर्माण विभागाची जबाबदारी आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), अल्प उत्पन्न गट (एलआयजी) आणि झोपड पट्टी पुन र्वसना वरल क्षकेंद्रित करून सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देणे आणि गृहनिर्माण क्षेत्रात व्यवसाय करणे सुलभ करणे हे या विभागाचे उद्दीष्ट आहे.

    कार्ये:

    • गृहनिर्माण धोरणांची आखणी व नियमन.
    • परवडणाऱ्या घरांच्या योजनांची अंमलब जावणी.
    • रेंटलआणि इन्क्लुसिव्ह हाऊसिंग मॉडेलला प्रोत्साहन.
    • झोपडपट्टी पुनर्वसन व पुनर्विकास उपक्रम.
    • जमीन वाटप आणि गृहनिर्माण पाया भूतसुविधांचा विकास.
    • शाश्वत आणि हरित गृहनिर्माण पद्धतींचा अवलंब.
    • डिजिटल गव्हर्नन्स आणि मॉनिटरिंग सिस्टीम मध्ये वाढ.
    • झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र व नागरी नूतनी करण प्रकल्पांची अंमलब जावणी.